*■ आपण काय आहोत हे महत्त्वाचं ■*
*━═━═━═━═━═━═━═━═━═━*
घोडा कितीही चांगला धावला, शर्यत जिंकली, मालकाला नाव मिळवून दिलं, तरी त्याच्या नशिबी चाबूक असतोच. कारण लोकांना वेग हवा असतो, त्यामागची वेदना पाहायची नसते.
झाडांनी कितीही गोड फळं दिली, सावली दिली, तहानलेल्यांला आधार दिला, तरी त्यांच्या नशिबी दगड असतोच. कोणी कौतुक करत नाही, फळं हवी असतात, झाड महत्त्वाचं नसतं.
माणूस, कितीही प्रामाणिक वागला, सर्वांसाठी चांगलं केलं, मनापासून मदत केली; तरी त्याच्या नशिबी टीका-टिप्पणी असतेच. कारण या जगात
चांगुलपणापेक्षा दोष शोधणारे जास्त असतात.
तुमची शांतता लोकांना कमकुवतपणा वाटतो. तुमचं यश लोकांच्या असुरक्षिततेला दुखावतं. तुमचं मोकळं हसू कुणाच्या तरी मनात मत्सर जागवतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, घोडा धावणं थांबवत नाही म्हणून तो महान ठरतो. झाड दगडांमुळे फळ देणं थांबवत नाही, म्हणून ते पूज्य ठरतं. आणि तुम्ही टीकेकडे दुर्लक्ष करून चांगुलपणाची वाट सोडत नाही,
म्हणूनच तुम्ही वेगळे ठरता.
टीका ही अपयशाची नाही, ती तुमच्या अस्तित्वाची पावती असते. म्हणून लोक काय म्हणतात यापेक्षा
आपण काय आहोत, हे जास्त महत्त्वाचं. तुम्ही चांगले राहा. चाबूक, दगड आणि शब्द ते आपोआप थकून जातील.
🙏🙏🌹🙏🙏
Post a Comment
0 Comments