*थरार !!*
#कथाविश्व
https://chat.whatsapp.com/F2uxhz2bJzqElmfrqAXs2j?mode=wwt
तो नेहमीप्रमाणे गावाला गेला होता , ती जेवणं आटपून झोपायच्या तयारीत होती . झोपण्याआधी U Tube वरचा "me time" चालला होता . उद्या फक्त मुलांचा डब्बा , बाई येईलच , म्हणजे सकाळ काही फार challenging असणार नाही - अगदी अलार्म न लावता उठलं तरी चालेल .
तेव्हढ्यात फोन वाजला , पोचला वाटते औरंगाबादला , मनात म्हणत तिने उचलला . तो बरोबर पोहोचला होता . पण तो जे काही बोलला त्याने तिच्या छातीत एकदम धस्स झाले . सगळी शांतता लोप पावली , क्काय ? तिचा आपल्या कानावर विश्वासच बसत नव्हता .
गेले 4-5 वर्ष त्याचं बरंच travelling चालायचं , आणि आजकाल तर जास्तच . नांदेड ला जमीन होती , राहणार मुंबईला . जमिनीचे legal matters निघाले त्यामुळे वरचेवर जावेच लागायचे . मुंबईतही मोठाच पसारा , त्यामुळे इकडची व्यवधान ही सांभाळावी लागायची . सगळ्याच गोष्टी urgent and important !! तो मुंबईत असला कि सकाळ अंगावर कोसळायची !! त्याच्या प्रत्येक कामात त्याला 'ती ' लागायची, इतकं कि तो आजूबाजूला असला कि तिला स्वतंत्र अस्तित्वच नसायचं . त्यामुळे तो गावाला गेला कि ती तशी mentally relaxed असायची . नाही म्हणायला , तिकडनं मधेच एखादा phone यायचा आणि अमुक file मधला तमुक पेपर स्कॅन करून पाठव , आधार कार्ड पाठव , कुठे तरी RTGS पाठव , कसलातरी बँक statement पाठव किंवा अमुक तमुक ला mail कर अशी काहीही ऑर्डर यायची , हे सगळं urgent !! त्यामुळे मधेच भसकन हातातलं काम सोडून हे सगळं करावं लागायचं किंवा कधी बाहेर असली तर धावत पळत घर गाठून हवी ती वस्तू हजर करावी लागायची . बरं तक्रार काय करणार बिचारी , त्याच्या धावपळीत आपली तेव्हढीच मदत असं म्हणत सगळं मनापासून करायची .
त्यादिवशी नांदेड ची कामं आटपून नंदीग्राम एक्सप्रेस ने तो औरंगाबाद ला उतरणार होता आणि दुसऱ्या रात्री , औरंगाबाद हुन तीच गाडी पकडून परवा पहाटे मुंबई ! प्रत्येक वेळी कुठल्याही गावाला जाताना गाडीत बसलो , सुखरूप पोहोचलो , कामं झाली / नाही झाली , निघालो सगळे update असायचे .
रात्री पावणे दहा - दहा च्या सुमारास ती relax होऊन बसली होती . आता झोपेपर्यंत पूर्ण वेळ तिचा स्वतःचा होता . लवकर झोप म्हणून टोकायला कोणी नव्हतं आणि झोपायची / उठायची काहीच घाई नव्हती .u tube वर गाणे ऐकत ती मजेत बसली होती.
तेव्हढ्यात फोन वाजला , पोचला वाटते औरंगाबादला , मनात म्हणत तिने उचलला . तो बरोबर पोहोचला होता . पण तो जे काही बोलला त्याने तिच्या छातीत एकदम धस्स झाले . सगळी शांतता लोप पावली , क्काय ? तिचा आपल्या कानावर विश्वासच बसत नव्हता . नक्की काय झाले हे कळल्यावर , अरे बाप रे आता बसला फटका !! काय तरी हा? सतत कामाचे विचार डोक्यात !
कशीबशी कामं उरकून त्याने ट्रेन गाठली होती. आपल्या जागेवर बसताना पाठीवरची बॅग त्याने side रॅक वर ठेवली, कपड्याची सुटकेस बर्थच्या खाली ढकलून तो स्थानापन्न झाला . स्वभाव बोलका , बाजूच्या जोडप्याशी बोलता बोलता औरंगाबाद कधी आले कळले पण नाही ! ट्रेन थांबली तसा सामान घेऊन तो उतरून बाहेर पडला , रिक्षात बसला . आता हॉटेल रूम गाठली कि ताणून द्यायची ! तेव्हढ्यात लक्षात आले कि त्याची पाठीवरची बॅग ट्रेन मधेच राहिली !! एरवी त्यातल्या सामानासाठी त्याला क्षणभरही वाईट वाटले नसते . छत्री , पाण्याची बाटली , नॅपकिन इ. हरवले तर फार काही फरक पडत नव्हता , अगदी काही डोक्यूमेंट्स असते तरी पुन्हा बनवता आले असते . पण त्या बॅग मध्ये फक्त याच वस्तू नव्हत्या .
एव्हाना ट्रेन ने स्टेशन कधीचे सोडले होते , अगदी रिक्षा platform वर घेऊन गेला असता तरी ट्रेन सापडणे अशक्य होते . तेंव्हा त्याने तिला फोन लावला .
या वेळी त्याने कधी नाही ते पाठीवरची बॅग नेली होती . तिथे फिरताना छत्री , पाण्याची बाटली , हाताशी काही पेपर्स ठेवायला सोयीची पडेल म्हणून, दिवसभर वागवली आणि आता ती बॅग तो चक्क ट्रेन मध्ये विसरला होता. बॅग जास्त सांभाळली कि लोकांना शंका येईल , आपल्या डोळ्या समोरच तर आहे , असा विचार करून त्याने side रॅक वर ठेवली आणि नेहमी बॅग न्यायची सवय नसल्यामुळे तिथेच विसरला .
नक्की काय झाले ते लक्षात येता येता तिची धडधड वाढत गेली. गेले आता सगळे !तिच्या हातात काहीच नव्हते , आणि आता त्याच्याही !! पण फोन त्याने केवळ हे सांगण्यासाठी केला नव्हता .
हे तिला समजले तसा तिच्या डोक्यात गोंधळच उडाला . तिला आता भीती वाटायला लागली , यातून चक्क 'जमत नाही ' म्हणून सूटावेसे वाटले , किंवा दुसऱ्या कोणावर सोपवावेसे वाटले . पण ते केवळ अशक्य होते . फोन ठेवून ती थोडा वेळ नुसतीच सुन्न बसून राहिली . आता यातून गत्यंतर नाही हे तिला कळून चुकले . तिने एक आवंढा गिळला आणि ती पुढच्या प्लांनिंग ला लागली . हे सगळे तिला एकटीलाच करायचे होते . एव्हडी जोखीम कोणाला सांगणार ? इतक्या रात्री तसेही कोणाला काय बोलणार ?
तिने driver ला फोन करून सकाळी सव्वा चारला बोलावले . तो एक अतिशय भरवशाचा माणूस होता , या बाबतीत ती निश्चिंत होती . त्याला आताच काही सांगायची गरज नव्हती. तिने पावणे चार चा अलार्म लावला व ती पलंगावर आडवी झाली . झोप लागण्याचा प्रश्नच नव्हता . मनातली धडधड अजूनही थांबली नव्हती . ती काम पूर्ण होई पर्यंत थांबणारच नव्हती . चूक करायला scope नव्हता . तिला प्रचंड दडपण आले .
ट्रेन संध्याकाळी पावणेपाच ला नांदेडहुन निघायची आणि रात्री साडेनऊला औरंगाबाद ला पोचायची . आणि औरंगाबादहून निघाली कि पहाटे पाच वाजता दादर !!
ट्रेन स्टेशनमध्ये यायच्या आत मला पोचायला हवं . तिने विचार केला. रेलयात्री वरून timetable काढलं , ट्रेन 4.58 ला दादर ला पोचणार होती , व 5.00 वाजता दादरहून VT साठी सुटणार होती . 2 मिनिट ती स्टेशनात थांबणार होती . त्याचा डब्बा नक्की कुठे येणार ते आधीच शोधायला पाहिजे आणि बरोब्बर तिथे उभे राहिले पाहिजे , ठरलेल्या जागी येतात का ट्रेन चे डब्बे ? कोण जाणे नाहीतर शोधण्यातच 2 मिनिट जायचे , नाही नाही! तिने विचार झटकून टाकला . ठीके चढू आपण बोगीत बरोब्बर पण उतरूच नाही शकतो तर ? तरीही ठीक आहे , फार तर फार VT हुन उलटं यावं लागेल , हरकत नाही . पण मुख्य म्हणजे , असेल का बॅग ठेवल्या जागी ? कोणीतरी बघितलं असेल कि हा माणूस 2 बॅगा घेऊन आला आणि एकच घेऊन उतरला तर ? रात्रीच्या अंधारात 'तो कोणी' आपली बॅग घेऊन मधल्याच स्टेशनवरून पसार तर नसेल झाला ? पण कोणाला काय माहित कि आत काय आहेत ? साधी बॅग कशाला कोण चोरेल ? आणि ते जोडपं , ज्यांच्याशी तो गप्पा मारत आला , ते टोकतील का त्याला ? का त्यांनीच आतापर्यंत .......? पण ते चांगल्या घरातले वाटत होते म्हणाला ........ देवा s s s सांभाळ रे बाबा ती बॅग ! पण मी जाऊन अशी एकदम बॅग घेऊन उतरले , तर मलाच चोर समजतील का ते ? 🙈🙈🙈🙈त्याचा एक फोटो घेऊन जाते आणि माझे एखादे ओळखपत्र , हां म्हणजे उगाच गैरसमज नको . त्या जोडप्याच्या लक्षात आले असेल का कि त्याची बॅग राहिली आहे ? त्यांनी चांगल्या उद्देशाने आत काही कॉन्टॅक्ट नंबर मिळतो का पाहण्यासाठी बॅग उघडून बघितली असेल तर ? ते काय समजले असतील त्याला? नंदीग्राम एक्सप्रेस पेक्षा दुप्पट वेगाने तिच्या विचारांची एक्सप्रेस धावत होती , कसेही करून थांबतच नव्हती , ना कुठले स्टेशन , ना कुठला सिग्नल .
मला नको आहेत काहीही विचार ! मला लवकर झोप लागली पाहिजे , नाहीतर सकाळी अलार्म च ऐकू आला नाही आणि मी उठलेच नाही तर ? बाप रे , नाही नाही , काही काय ? श्श्श्शश! झोप आता , उठशील तू ! तिने स्वतःला दटावले . तिला एकाच वेळी त्याचा आणि सगळ्या परिस्थीचा राग हि येत होता आणि त्याच वेळी आता फक्त आपणच काहीतरी करू शकतो हि जाणीव तीव्र होत होती . त्या 2 मिनटात ट्रेन मधून बॅग काढण्याचे काम तिला जमले नाही तर मात्र तिने स्वतःला कधीच माफ केले नसते . नाही नाही मी नक्की काढीन ती बॅग 2 मिनटात !! फक्त देवा , ती बॅग जागेवर असुदे . सद्गुरू माझ्या पाठीशी रहा .
तिला आठवले , खूप वर्षांपुरवी अशीच एकदा त्याची briefcase पिझ्झा जॉईंट वर राहिली होती . मुलं अगदी लहान होती , दीड आणि साडे सहा वर्षांची , आणि नुकतेच पिझ्झा brands चे पेव फुटले होते . त्यांनी मुलांना बाहेर न्यायाचा प्रोग्रॅम केला . नेहमीप्रमाणे तो वेळेत घरी येऊ न शकल्याने ती मुलांना घेऊन गाडीने पिझ्झा जॉईंट वर पोचली होती , तो directly आला होता .आधी वाट बघून मग डिरेक्टली भेटायचं प्रोग्रॅम केल्याने , पोचायला बराच उशीर झालेला . उभ्या उभ्या खाण्याचा स्टॉल होता तो . डिश ठेवायला थोडा कट्टा केला होता , पण मुलांसाठी तो उंच होता , त्यामुळे लहान्याला त्यावर बसवून बॅलन्स करत दोघांनी म्हणजे चौघांनी पिझ्झा खाल्ला होता . तो कायम बाहेर असायचा त्यामुळे मुलं बरोबर असली कि तो फक्त त्यांनाच वेळ द्यायचा . लहाना कायम त्याच्या कडेवर असायचा बाहेर असताना . घरी परत यायला रात्रीचे जवळ जवळ अकरा वाजले होते . Highway वरून आत वळताना तो तिला म्हणाला , माझी briefcase घेतलीस न तू ? त्याने विचारले आणि ती चपापली . गाडी थांबवून बघितले पण ती briefcase काही गाडीत नव्हती . त्यांनी फोन नंबर शोधायचा प्रयत्न केला , पण तो काही मिळाला नाही .मागे फिरून , तो स्टॉल बंद व्हायच्या आत पोचणे आवश्यक होते !! त्यांना घरी सोडून एकटा गेला तर उशीर झाला असता त्यामुळे चौघेही निघाले .मुले गाडीतच झोपाळली . असाच देवाचा धावा केला होता - तो स्टॉल उघडा असुदे आणि तिथे बाहेरून ठेवलेली आमची ब्रीफकेस असुदे . त्या पिझ्झा जॉईंट वाल्याला माहीतही नसेल कि बाहेरून पायाशी आम्ही बॅग ठेवली होती. आतून त्याला काही दिसत नव्हते . पण दुसऱ्या customer ला ती सहज उचलून नेता आली असती . एकदाचे ते पोचले होते आणि briefcase सापडली होती . कित्ती हायसे वाटले होते तेंव्हा ! आहे आपल्या पाठीशी तो . तिला आश्वस्त वाटले . मिळेल उद्याही आपल्याला बॅग .
दुसऱ्या दिवशी पहाटे अलार्म च्या आधीच उठून ती पटकन तयार झाली , चहा घेतला , driver नेहमी प्रमाणे वेळे आधीच दारात हजर होता . देवाला नमस्कार करून ती निघाली . बाकी सगळया शंका कुशंका बाजूला ठेऊन फक्त पुढची स्टेप correct पार करण्यावर तिने फोकस केले .
ती दादर ला पोचली , ट्रेन अजून यायची होती , तिने पटकन आधी प्लॅटफॉर्म तिकीट काढले , हो उगाच नसते लफडे नको , तिला बाकी बरेच प्रॉब्लेम्स होते . गाडी कुठल्या प्लॅटफॉर्म वर येते ते बोर्ड वर बघून व चौकशीच्या विंडो वर खात्री करून ती स्टेशनमध्ये शिरली . त्याच्या बोगीच्या जागेवर जाऊन उभी राहिली . ट्रेन येईपर्यंत चा वेळ निघत नव्हता . तिने कुली कडे चौकशी केली , ट्रेन वेळेवर येते का उशीर होतो ? याच प्लॅटफॉर्म वर येते ना ? 2nd AC ची बोगी इथेच येईल ना ? हो कारण चुकायला स्कोप च नव्हता . आता राहता राहिला एकच प्रश्न . बॅग जागेवर असेल का ? Time will tell!!
शेवटी एकदाची ट्रेन आली , बोगीची position हि बरोबर होती . कोणी उतरायच्या आत ती पटकन चढली . दाराजवळचीच सीट होती . आत जाताच तिची नजर वर गेली , निळ्या काळ्या रंगाची FACEBOOK लिहिलेली बॅग तिथेच होती . तिला कित्ती हायसे वाटले . ती उगीचच त्या जोडप्याशी बोलली , हसून म्हणाली माझे मिस्टर होते ना काल या बर्थवर , गोरे , उंच , चष्मा वाले ? त्यांची बॅग . ते उतरले बघा औरंगाबाद ला . ती बाई म्हणाली हो आमच्या लक्षात आले त्यांची बॅग राहिली पण contact कसा करावा कळत नव्हते . त्यांना तिची काही शंका आली नाही . चांगले होते बिचारे . ती कसनुसं हसत पटकन ट्रेन च्या बाहेर आली . आता कधी एकदा बॅग उघडून बघते असे झाले तिला . पण इथे नको , गाडीत बसून बघूया . ती बाहेर येऊन पटकन गाडीत बसली.
तिने बॅग उघडली , वरचा नॅपकिन काढला , त्याखाली पेपर्स होते ते काढले , त्याखाली एक प्लास्टिक च्या बॅग चे पुडके होते . धडधडत ते तिने उकलले . हुश्श !
झाले असे होते कि , नांदेड ला कोणीतरी जमिनीचे व्यवहाराचे टोकन म्हणून दीड लाख रुपये दिले होते . ते त्याने त्या
पाठीवरच्या बॅगेत ठेवले होते . आणि ती बॅग तो ट्रेन मध्ये विसरला होता ! त्याचे मेहनतीचे एव्हढे पैसे ! ते गेले असते तर ?
आता ती सैलावली . काल पासून तिचे सगळे शरीर tense होते . पैसे मोजायला हवेत , तिने विचार केला . पण या सगळ्या excitement मध्ये ते नक्की होते तेव्हढे आहेत का नाही , तिला काही सुधरत नव्हते . जाऊदे आता , उद्या बघेल तो . आता कमी असतील तरी खरंच कोणीच काहीच करू शकत नाही . तिने डोळे मिटून घेतले .
क्षणार्धात तिला एकदम आनंदाच्या , excitement च्या उकळ्या फुटायला लागल्या !! आईशपथ ! काय सॉलिड काम केलंय मी !! ती स्वतःवरच खुश झाली. आत्ता लगेच कोणाला सांगू कोणाला नको असे तिला झाले . पहाटेचे फक्त साडे पाच वाजले होते . तोही तिकडे अजून उठला नव्हता . घरी तर कोणाला काहीच माहित नव्हते . म्हणजे ती घरात नाही हे हि कोणाच्या लक्षातही आले नसेल . कधी एकदा त्याला सांगते असे झाले तिला . काहीही थरार चालतो आपल्या घरात ! खरंच विश्वास तरी बसेल का कोणाचा ? एक दीड लाखाची , बिनकुलपाची बॅग ट्रेन मध्ये राहते ,पॅसेंजर शिवाय एकटीच रात्रभर प्रवास करून डेस्टिनेशन गाठते , आणि सकाळी योग्य व्यक्तीच्या हातात पडते !! ट्रेन मधल्या कोणाला काहीही कळू न देता !!
म्हंटलं तर केवळ ट्रेन मध्ये राहिलेली एक बॅग मिळवायचे काम होते पण तिच्यासाठी एका थरारनाट्यापेक्षा कमी नव्हतं ते आव्हान !!
*सौ रीटा खांडेकर*
कथाविश्व - थरारक कथांचे अनोखे विश्व 🎉
फोटो सौजन्य pinterest
Post a Comment
0 Comments