सरत्या वर्षाला निरोप 🙏😊🚩
सूर्य रोजच उगवतो आणि मावळतो, प्रवासी झाडाखाली थांबतात आणि पुढे निघून जात असतात, लोक आयुष्यात भेटतात आणि निघून जातात, तसेच काळ हा अत्यंत चपळ आहे, तो कोणासाठीही थांबत नाही आणि त्याला थांबवताही येत नाही.
"कालो गच्छति, न च तिष्ठति, न च प्रतीक्षां करोति"
खरंच काळ किती गद्यमान आहे ना? परिवर्तन हाच काळाचा नियम आहे. तो सर्वाना मान्य करावाच लागतो. याच निसर्ग नियमानुसार २०२५ ला निरोप देण्याची आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्याची वेळ जवळ आली आहे. जुने अनुभव पाठीस घेवून पुढे वाटचाल करायची वेळ आली आहे.
सरत्या वर्षाला निरोप देणे फार अवघड असतय. तरी एक आशा मनात रेंगाळत असते. दिवस सरतात, तसं वर्ष बदलतं. आयुष्यातील एक वर्ष बघता बघता आयुष्यातून निघून जातं. पण जाताना काही गोड तर काही कटू आठवणी कायमचाच देऊन जातं. डिसेंबर आणि जानेवारीचं काही क्षणांसाठी मिलनही होतं, पण दोघांनाही तेव्हा समजत नाही, आनंदाने हसायचं की सोडून जातोय म्हणून रडायचं?
खरं तर आपलं नवीन वर्ष गुढीपाडव्याला सुरू होतं. आपले सण-उत्सव हे ऋतुमानाप्रमाणे आपण साजरे करतो. गुढीपाडव्याला झाडांची जुनी पालवी गळून नवीन पालवी फुटते. सर्वसृष्टी नवचैतन्याने बहरून जाते, त्यावेळेला माणसाच्या मनामध्ये निसर्गाकडे पाहताना आनंदाचा बहर येतो.
आज-काल हे आपण विसरत चाललो आहोत आणि १ जानेवारीपासून आपण नवीन वर्ष साजरे करू लागलो आहोत. याचं कारण म्हणजे, आपल्या देशावर अनेक धर्मांचे राज्यकर्ते आले, राज्य केले आणि निघून गेले. जाताना त्यांनी त्यांच्या संस्कृतीच्या काही खुणा मागे सोडल्या आणि नकळत त्या आपल्या संस्कृतीमध्ये मिसळल्या गेल्या. त्यापैकी एक ३१ डिसेंबरला सरत्या वर्षाचा निरोप देऊन, १ जानेवारीला नवीन वर्षाचं स्वागत करायची ही पद्धत इंग्रजांची. कोणी काहीही म्हणा पण ही पद्धत आपण मोठ्या मनाने अंगीकारली. रात्री उशिरापर्यंत पार्ट्या, खाणं-पिणं, नाच-गाणं करून रात्री बाराला नवीन वर्षाचे स्वागत करायचे. हे चित्र आजकाल सर्वत्र दिसत आहे. मोठ्या उत्साहाने संपूर्ण जगभर नवीन वर्षाचं स्वागत करण्याची आणि सरत्या वर्षाला निरोप देण्याची पद्धत आहे. असो.
सरत्या वर्षाला निरोप देणं म्हणजे भूतकाळातील सुख-दुःखाच्या आठवणींना उजाळा देऊन, चुकांमधून शिकून नवीन वर्षात नव्या उमेदीने आणि सकारात्मक विचारांनी पुढे जाण्याची तयारी करणे होय; यात कृतज्ञता व्यक्त करणे, नवीन संकल्प करणे आणि भविष्यासाठी आशा बाळगणे हे महत्त्वाचे असते.
“जुने ते सोने” उक्तिप्रमाणे नम्रता अंगी बाणावी. व जुन्याचे आभार मानायचे.आपण जुन्यातून सुखरूप बाहेर पडतोय , हे काय कमी आहे. रडत,कुढत बसू नये. जिद्द बाळगून ध्येयाचा विचार करायचा. तेंव्हाच आपली स्वप्नं साकार होवू शकतात.
निरपेक्ष भाव व कर्मप्रधान दृष्टीकोन ठेवल्यास प्रयत्नांती सर्व इच्छा पूर्ण होण्याची प्रचिती येत असते.
आपण सरत्या वर्षाला मनापासून धन्यवाद देऊया. सु:खदु:खाचे दिवस भरभर निघून जातात، कालभ्रमण कधी थांबणार थोडेच आहे. ती आपले कार्य करत असते आपण आपले कार्य करत राहूया. सामाजिक बांधीलकी जपुन राहूया.
कोणत्याहीलाही निरोप द्यायची वेळ आली की वाईट वाटते. शालेय निरोप समारंभ सोडताना कोणाची सेवानिवृत्ती वृत्ती असो की माहेर लोकांचा निरोप पहिला दु:ख, हुरहुराचे वजना असतो. भावबंध जुळलेले असतात आणि आता निरोप क्षण क्षण. तेव्हाच सर्व आठवणींची उजळणी होत असते. आपण या वर्षात कोणते कार्य चांगले केले आहे? आपण किती जणांना सुख दिले किंवा कोणी दुखावले असतील अश्याच्या भेटीतून मळभ दूर करून त्यांना आनंद वाटतो.
चला तर मग एक दिवस आला आहे २०२५ सालाला निरोप आहे. या सरत्या वर्षाला निरोप देत, नवी स्वप्नं, आशा, नवी उमेद व नावाची कास धरत नवीन वर्ष चंद्र स्वागत करूया. अनेक आठवडे ठेवा जया, वर्षभर प्रत्येक वाटचाल आनंदाने चालू ठेवा, हा 'आपला' करून, सुख-समृची नवी पहाट आणूया...
सरत्या वर्षाला आज निरोप,
दिवसींचा आनंदाने ठेवा.
थोडी वर्षाची नवी पहा,
थोडे उमेदीने करू स्वागत!
स्वप्ने नवी, आशा नवी,
उमेद नवी देखी मनी ।
नावाची कास धरू,
सुख-समृद्धीची वाट धरू.
प्रत्येक क्षण हा 'आपला' करू,
आनंदाने जगू !
चला, वर्षाचे स्वागत करूया,
सुख-समृद्धीची नवी पहाट आणूया !
सरत्या वर्षा निरोप देत स्वप्नाला, आशा, नवी उमेद व नावाची कास धरत नवीनच स्वागत करू, आपली सर्व स्वप्ने, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह, नवीन वर्षांचे हार्दिक अभिनंदन ! 💐🙏😊
Post a Comment
0 Comments