Type Here to Get Search Results !

निर्णय कथा

 🪻🪻🪻🪻🪻🪻🪻🪻


कोर्टामध्ये कागदावर शेवटची सही होताच वकिल हसून म्हणाले...

“घ्या मॅडम, आता तुमचा घटस्फोट झाला.

कोर्टानं तुम्हाला 30 लाख रुपये नुकसान भरपाई मिळवून दिलीये,

आणि दर महिन्याला 20,000 रुपये खर्चासाठी मिळत राहतील.

आता खुश ना?”


ती हलकेसे स्मित करून म्हणाली..

“हो… खुश आहे… आता मला कुणाकडून काही नकोय.” 🙂


वकील कागद गोळा करू लागला…

आणि कविता आई–वडिलांसोबत बाहेर पडली.


कोपऱ्यात निर्वाण—तिचा नवरा—सगळं शांतपणे पाहत उभा होता.

कवितेनं एकदाही त्याच्याकडे पाहिलं नाही.

गाडीचं दार बंद झालं…

आणि नातंही. 💔


पहिला महिना—

मायकेत सगळे फार प्रेमानं वागले.

कवितेला वाटलं—

“हेच तर स्वातंत्र्य… हाच तर शांतपणा!” 🌼


दुसरा महिना—

घरच्यांचा सूर थोडा बदलू लागला.

भाऊ कधी रागानं बोलायचा,

वाहिनी टोमणे मारायची—

“मोठी झालीस, थोडी जबाबदारी घे ना…”

भाचेही म्हणू लागले—

“आत्त्या, किती दिवस राहणार इथे?”


तिसरा महिना—

घरातलं वातावरण बदलू लागलं.

जिथं आधी प्रेम होतं, तिथं आता भार वाटू लागला.

कविता शांत व्हायची… पण मनात दुख वाढत राहायचं.


चौथा महिना—

तिच्या प्रत्येक गोष्टीवर नजरा ठेवायला लागले.

बाहेर पडली की शेजारच्यांची खुसफुस—

“तिचा घटस्फोट झालाय… आता माहेरीच राहणार?”


कवितेच्या आत काहीतरी तुटत होतं.

तिला पहिल्यांदा जाणवलं—


सासरी नातं कठीण होतं, पण ते तिचं स्वतःचं घर होतं. माहेरी ती ना पाहुणी, ना घरची—फक्त एक ओझं. 😔


एक रात्री टेरेसवर बसून ती विचार करू लागली—

“पैसे मिळाले… स्वातंत्र्य मिळालं…

पण इज्जत? आपुलकी? आणि घर?”


ती स्वतःशी कुजबुजली—

“चूक केली…

फैसला घेताना मी फक्त दु:ख पाहिलं, पण परिणाम पाहिलेच नाही…”


तिला कळलं—

तुटलेल्या नात्यानंतर बाईला सर्वात जास्त आधाराची गरज असते,

पण समाज आधी तिला जज करतो.


आणि माहेर…

“माहेर आहे, पण अधिकार काहीच नाही.”

“माझं खरं घर मी माझ्या अहंकारानं सोडून आले…”


डोळ्यात पाणी आलं. 💧

निर्णयाची किंमत आता समजत होती.


चार महिने पूर्ण झाले…

कवितेला रोज एकच प्रश्न सतावू लागला—

“मी काय गमावलं…?

फक्त राग आणि टोमण्यांमध्ये वाहून इतका मोठा निर्णय घेतला…?”


ती आकाशाकडे बघत बसायची…

निर्वाणच्या आठवणी मागून धावत यायच्या—

त्याच्या सवयी, छोटी भांडणं, आणि सर्वात जास्त—

त्याचं साथ देणं.


एका रात्री मन पूर्ण तुटलं.

तिनं फोन उचलला… नंबर लावला.


कॉल लागला—


“हॅलो?” — निर्वाण.


कविता थरथरत्या आवाजात—

“निर्वाण… आपण… आपल्या नात्याला पुन्हा एक संधी देऊ शकतो का?

मला तुझी फार आठवण येते…

मला तुझ्यासोबत राहायचंय…”


दोन्ही बाजूला काही क्षण शांतता…


निर्वाण हळूच म्हणाला—

“मीही तुझ्याविना राहू शकत नाही…

आपली चूक दोघांची होती, सुधारायला दोघांनीच सोबत चालायचंय.

तू ‘हो’ म्हणालीस…

तर मी आत्ताच निघतो.”


कवितेच्या गालावरून आसवं वाहू लागली—

“हो… मी तयार आहे.”


रात्रीचे 12 वाजले होते.

निर्वाण कार घेऊन निघाला.

थंडी, सुनसान रस्ता…

पण मनात एकच आवाज—

“तिला परत घरी आणायचं आहे.” ❤️


सलग 5 तास ड्राइव्ह केला.

ना थांबला, ना दमला.


सकाळी 5 वाजता

तो कवितेच्या माहेरच्या दारात उभा होता.


कविता बाहेर आली—

घाबरलेली, लाजलेली… पण दिलासा मिळालेला चेहरा.


आई–वडिलांनी दार उघडलं.

निर्वाणनं नम्रपणे प्रणाम केला.

कवितेने  बॅग उचलली.

ना बोलणं, ना वाद—

दोघांना कळलं, हे निर्णय मनातून घेतलेलं आहे.


कार सुरू झाली…

आणि कविता परत तिच्या घराकडे—खऱ्या घराकडे—निघाली. 🏡💖

✨ मित्रांनो...

नाती मोडत नाहीत.

फक्त कधी कधी त्यावरील धूळ हळूवार साफ करायची असतो.

योग्य वेळी घेतलेलं छोटंसं पाऊल—

संपूर्ण आयुष्य वाचवू शकतं… 💤


🌞🌞

“रागाच्या क्षणी घेतलेला निर्णय खरंच आपल्या आयुष्याची दिशा बदलण्याइतका योग्य असतो का?”


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Post a Comment

0 Comments