Type Here to Get Search Results !

चंद्रग्रहण

 *🙏🏵️‼️श्री स्वामी समर्थ‼️🏵️🙏* 


*💯🌹#खग्रास चंद्रग्रहण🌹💯* 


 *फाल्गुन शु.१५(पौर्णिमा) ,मंगळवार , ०३ मार्च २०२६* 


*👉#यंदाचे पहिले खग्रास चंद्रग्रहण ३ मार्च २०२६ रोजी होणार आहे, हे ग्रहण भारतातून दृश्यमान असेल. भारतीय वेळेनुसार हे ग्रहण दुपारी ३:२० ते संध्याकाळी ६:४७ वाजेपर्यंत राहील,हे ग्रहण आशियाऑस्ट्रेलियापॅसिफिक बेटे आणि उत्तर-दक्षिण अमेरिकेतून दिसणार आहे.* 


 *महत्वाची माहिती:* 

 *👉#तारीख:* ३ मार्च २०२६ (मंगळवार)


 *👉#वेळ:* दुपारी ३:२० ते संध्याकाळी ६:४७.


 *👉#दृश्यता:* भारतातून दिसणार.




*👉#ग्रहण दिसणारे प्रदेश - भारतासह संपूर्ण आशिया खंड ,आफ्रिका खंड , संपूर्ण युरोप , ऑस्ट्रेलिया , न्यूझीलंड , नॉर्वे , अंटार्टिका या प्रदेशात खग्रास चंद्रग्रहण दिसेल.*


*👉#ग्रहणाचा स्पर्श :- दुपारी ३:२०*

 *ग्रहण मध्य :- संध्या ५:०४*


*👉#ग्रहण मोक्ष  :- संध्या ६:४८*


*👉#ग्रहणाचा पर्वकाल :- ३ तास २७ मिनिटे*


*🌹#ग्रहणाचे वेध :-*


 *👉#ग्रहणाचे वेध मंगळवार , दि. ३ मार्च २०२६, सकाळी ६:२० पासून लागणार असून ग्रहण मोक्षापर्यंत म्हणजेच संध्या ६:४८ ग्रहणाचा वेध पाळावेत ,* 


 *👉#बाल , वृद्ध , अशक्त , आजारी व्यक्ती आणि गर्भवतींनी मंगळवारी सकाळी ११:०० पासून मोक्षापर्यंत म्हणजेच संध्या ६:४८ पर्यंत वेध पाळावेत ,* 


 *👉#वेधामधे भोजन करू नये , स्नान , जप , देवपूजा , श्राद्ध इत्यादी करता येईल , तसेच पाणी पिणे , झोपणे , मलमूत्र उत्सर्ग करता येईल .* 


 *👉#ग्रहण पर्वकाळात म्हणजे ग्रहण स्पर्श ते मोक्ष या काळात पाणी पिणे , झोपणे , मलमूत्र त्याग ही कर्मे करू नयेत.* 


*🌹#ग्रहणातील कृत्ये*


 *👉#ग्रहण स्पर्श होताच स्नान करावे ,* 




 *👉#ग्रहणात सर्व उदक गंगेसमान आहे तरीही उष्णोदकाहून शितोदक पुण्यकारक,पाणी वर काढून स्नान करण्यापेक्षा वाहते पाणी , सरोवर , नदी , महानदी , गंगा , समुद्र यांचे स्नान उत्तरोत्तर श्रेष्ठ व पुण्यकारक आहे,सूर्यग्रहणात नर्मदा स्नानाचे विशेष महत्त्व सांगितले आहे, नर्मदास्नान शक्य नसल्यास स्नानाची वेळी नर्मदेचे स्मरण करावे .* 


 *👉#पर्वकाळात देवपूजा , तर्पण , श्राद्ध , जप , होम , दान करावे.* 


 *👉#पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण करावे.*


 *‼️श्री स्वामी समर्थ #गुरुमाऊली‼️*

Post a Comment

0 Comments