आज माझ्या घरी साखर संपली होती.
विचार केला... बाहेर जायचं कशाला? Blinkit वरूनच ऑर्डर टाकूया 📱
मोबाईल उचलला, दोन क्लिक केले आणि स्क्रीनवर आलं…
१० मिनिटांत डिलिव्हरी ⏱️
मनाला एकदम शांतता मिळाली. मी माझ्या कामाला लागले.
पण हेच ते १० मिनिटं…
आज आपणा सगळ्यांना याची सवय लागली .
एक बटण दाबायचं आणि समोरचा माणूस नाही, जणू एखादी मशीनच काम करते असं गृहित धरायचं 🤖
वेळेत आलं तर ठीक,
आणि २–४ मिनिटं उशीर झाला तर
राग 😡, तक्रार 📞, कधी ऑर्डर कॅन्सल ❌
आजही दारावर टकटक झाली …
थोडा उशीरच झाला होता.
दार उघडलं, तर समोर एक मुलगा उभा.
वय फारसं नव्हतं,
पण चेहऱ्यावर जबाबदाऱ्यांच्या रेषा होत्या.
श्वास जोरात चालू होता,
हात किंचित थरथरत होते,
आणि डोळे…
जणू खूप काही सांगायचं होतं 😔
सामान घेतलं.
पण का कुणास ठाऊक, तोंडातून एवढंच निघालं..
“सगळं ठीक आहे ना?
तुम्ही खूप टेन्शनमध्ये दिसताय.”
आणि तिथेच त्याचा संयम तुटला…
डोळ्यांतून अश्रू वाहायला लागले 😢
ना आवाज, ना हुंदका…
जणू वर्षानुवर्षं रडायलाच परवानगी मिळाली नव्हती.
थोड्या वेळाने म्हणाला,
“मॅडम… आजपर्यंत कुणी हे विचारलंच नव्हतं.
उशीर झाला की लोक फक्त रागावतात.
कधी सामान परत देतात,
कधी ऑर्डर कॅन्सल करतात.”
तो थांबला.
श्वास सावरला.
आणि अगदी हळू आवाजात म्हणाला —
“माझी बायको हॉस्पिटलमध्ये आहे.
आज तिची डिलिव्हरी आहे 🤰
फोन येतोय — लवकर ये म्हणतात.”
तो क्षण…
जणू वेळच थांबला ⏳
माझ्यासमोर डिलिव्हरी बॉय नव्हता.
माझ्यासमोर एक नवरा उभा होता,
जो बाबा होणार होता 👨👩👦
तो पुढे म्हणाला,
“रस्त्यातच हॉस्पिटल लागतं.
एकदा पाहून येऊ म्हणालो…
फक्त एक क्षण.
पण त्याच क्षणात उशीर झाला.”
तो अपराधी वाटत होता.
जणू काही गुन्हाच केला आहे अशा नजरेने.
पण खरं तर
तो गुन्हेगार नव्हता…
तो मजबूर होता.
एका बाजूला बायको वेदनांशी झुंज देत होती,
आणि दुसऱ्या बाजूला नोकरी —
ज्यामुळे घर चालतं.
ड्युटी सोडली असती तर
नोकरी जाण्याची भीती.
आणि उशीर झाला तर
लोकांचा राग 😔
आज तो अडकला होता
कुटुंब आणि पोटाच्या मध्ये.
मी पूर्णपणे गप्प झाले.
डोळे भरून आले 🥺
मन खूप जड झालं.
आपण ज्या १० मिनिटांसाठी भांडतो,
आरडाओरडा करतो,
कधी कधी तेच १० मिनिटं
कोणाच्या आयुष्यातले
सगळ्यात मौल्यवान क्षण हिरावून घेतात.
आज एक गोष्ट उमगली —
👉 प्रत्येक उशीर म्हणजे बेपर्वाई नसते.
👉 प्रत्येक माणूस लापरवाह नसतो.
काही लोक गप्पच
आपल्या आनंदाचा,
आपल्या अश्रूंचा,
आपल्या स्वप्नांचा बळी
इतरांच्या सोयीसाठी देत असतात 💔
आपण खोलीत बसून सेकंद मोजतो,
आणि कुणीतरी रस्त्यावर
आपलं संपूर्ण आयुष्य सांभाळत धावत असतो 🚴♂️
एक छोटीशी विनंती 🙏
पुढच्या वेळी कुणी थोडा उशिरा आला तर
रागावण्याआधी
फक्त एकदा विचारा —
“सगळं ठीक आहे ना?”
कदाचित समोर उभा असलेला माणूस
कुणाचा नवरा असेल,
कुणाचा बाबा असेल,
कुणाचा मुलगा असेल…
जो जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबलेला
फक्त थोडीशी माणुसकी शोधत असेल ❤️
कारण
आपण ग्राहक आहोत…
पण तोही माणूस आहे.
👉 माणूस आधी.
सोय नंतर.
Post a Comment
0 Comments